आमच्या सेवेच्या वापरासाठी महत्वपूर्ण नियम आणि अटी
1. सौ श्री नाती वधू-वर शोधक मंडळ हे मुख्यत्वे संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बाहेरील राज्यातील व परदेशातील मराठा, कुणबी, ९६ कुळी मराठा समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित विवाह इच्छुक , अविवाहित, घटस्फोटित, विधवा/विधुरवधू-वरांची नाव नोंदणी होते.
2. वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या सर्व स्थळांची माहिती कधीही पाहू शकता.
3. रजिस्ट्रेशन विनामूल्य. आवडलेल्या स्थळांची संपर्क माहिती सशुल्क.( प्रति स्थळ प्रती वेळ 200 रुपये)
4. नावनोंदणी नंतर स्थळाचा फोटो आणि बायोडाटा वेबसाईट वर अपलोड केला जातो आणि त्यानंतर आपणास एक प्रोफाईल आयडी (Profile ID) मिळतो.
5. बायोडाटा मध्ये दिलेल्या माहितीची अचूकता प्रत्येकाने स्वतः तपासून घ्यायची आहे.
6. केंद्रातील माहितीचा कोणीही गैरवापर करू नये. तसे आढळल्यास संबंधितांचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.
7. नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्थळाबद्दलची खरी खरी माहिती फॉर्म भरतेवेळी द्यावी. हे नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. यात काही असत्य आढळल्यास त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तीची असेल याची नोंद घ्यावी.
8. सभासदांनी पसंत केलेल्या स्थळांच्या जातीसह सर्व माहितीची खातरजमा स्वतःच, आपले नातलग, मित्र मंडळी यांच्याद्वारे करून घ्यावी आणि नंतरच पूर्ण चौकशी आणि विचाराअंतीच लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था अथवा संस्था चालक, संचालक, संयोजक जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.
9. नावनोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल याची हमी आम्ही देत नाही. विवाह जुळणे हा एक योगायोग आहे.
10. केंद्रातर्फे किंवा स्वतःच्या प्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधीची माहिती कार्यालयास विनाविलंब कळवावी. संस्थेच्या वतीने फक्त ऑनलाईन बायोडाटा वेबसाइटवरून काढला जाईल. अनावश्यक कॉल्स टाळण्यासाठी विवाहयोग जुळल्याची माहिती जबाबदारीने संस्थेला कळवणे बंधनकारक आहे.
11. ऑनलाईन द्वारे एका सभासदाला आपल्या प्लॅननुसार दर 3 दिवसातून त्यांचे स्थळाला मॅच होणारे 1 ते 5 बायोडेटे घेता येतात. म्हणजे प्रत्येक सभासद प्लॅननुसार दर 3 दिवसात 1 ते 5 बायोडाटांचे संपर्क क्रमांक, वधू/वराचे नाव, पालकांचे नाव, ईमेल, घरचा पत्ता इत्यादी माहिती घेऊ शकतो.
12. सभासदांनी आपल्या पसंतीच्या स्थळांना स्वतः संपर्क साधावा आणि पुढची बोलणी करावीत. संस्था आपल्याला फक्त बायोडाटा पुरवण्याचे काम करेल.
13. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही. अकाउंट न. 43560069623 , आय एफ सी कोड : SBIN0003872
14. नावनोंदणीसाठी खालील कागद पत्रे बरोबर आणावीत / पाठवावीत.
15. वरीलपैकी काही कागदपत्रे नावनोंदणीवेळी उपलब्ध नसल्यास नंतर शक्य तितक्या लवकर पाठवावीत.
16. केंद्राच्या वेबसाईटवर स्थळांची फोटोसह माहिती ठेवल्यास आपण संपर्क केलेल्या सभासदांना आपली माहिती फोटोसह जगात कुठेही पाहू शकतात. त्यामुळे आपला वेळ व दरवेळी फोटो / माहिती पाठविण्याचा त्रास वाचू शकतो.
17. वेबसाईटवरील अनुरूप असलेल्या स्थळांच्या महितीतील फक्त नाव फोन नंबरची माहिती WhatsApp/मेलमध्ये वरून दिली जाते.